प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- जुना राजवाडा पोलिस पेट्रोलींग करीत असताना कंळबा जेल मध्ये गांजाच्या पुड्या फेकताना दोघांना रंगेहात पकडून त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलासह दोघांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मुळे कंळबा जेलची सुरक्षा बेभरोसे म्हणायला हरकत नाही.
कंळबा जेलात या अगोदर मोबाईल आणि गांजा सापलल्याच्या घटना घडत असतानाच काही दिवसांपूर्वी कंळबा जेलच्या कॉन्स्टेबलकडे अंग झडतीत गांजा सापडला होता.त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी अ टक केली होती.आता परत एकदा गांजा फेकताना या तिघांच्या कारवाई करून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून यातील या दोघांना गांजा देणारा फरार झाला आहे .