जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांची माहिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
जयसिंगपूर/प्रतिनिधी:
सांगली येथे कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी आज सनसिटी हॉटेल हॉल मध्ये आयोजित जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
जिल्हाध्यक्ष विलास कांबळे पुढे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर करणार असून यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत, युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शासनाने जारी केलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द व्हावा, 62000 शाळांचा शाळा दत्तक योजनेअंतर्गत खाजगी कंपन्यांचा प्रवेश करण्याचा निर्णय रद्द करावा, स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांची फी कमी करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाची सुरुवात विश्रामबाग चौक सांगली येथून सकाळी 11 वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हा महासचिव महादेव कुंभार, पुंडलिक कांबळे, जिल्हा सचिव जयेश कांबळे, विश्वास फरांडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय सुतार, प्रताप तराळ, रवींद्र तराळ, तानाजी काळे, जिल्हा उपाध्यक्ष भरत सोरटे, अशोक गायकवाड, जिल्हा संघटक शितल माने, प्रल्हाद वडर, जिल्हा कोषाध्यक्ष विकास बचाने, अमितकुमार देवामोरे, भानुदास कांबळे, गजानन कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, रमेश पोवार, शिरोळ तालुका उपाध्यक्ष उदय कांबळे, कुरुंदवाड शहर अध्यक्ष अमोल मधाळे, भास्कर कांबळे, इचलकरंजी कामगार आघाडी कलंदर बाडीवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संजय सुतार
जिल्हा प्रसिध्दी प्रमुख
वंचीत बहुजन आघाडी ( उ ) कोल्हापूर.