व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रिय ऊर्दू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद... ऊर्दू माध्यमाच्या पत्रकारात नव चैतन्य

पत्रकार आणि पत्रकारिता लोकशाही ची गरज... एकनाथ खडसे..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अब्दुल  कय्युम : 

जळगाव -  माध्यम स्वातंत्र्या शिवाय लोकशाहीला काहीही अर्थ नाही. सशक्त्त लोकशाहीसाठी पत्रकार आणि पत्रकारिता आवश्यक आहे. असे मत माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी  जळगाव येथे व्यक्त केले.

व्हॉईस ऑफ मीडिया  या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या उर्दू विंग तर्फे ऊर्दू  माध्यमा चे राष्ट्रीय सम्मेलन भरविण्यात आले होते, त्यात ते प्रमुख  अतिथी म्हणून बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडिया च्या ऊर्दू विंगचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मुफ्ती मोहम्मद हारून नदवि होते. जळगाव मधील ईकरा महाविद्यायाच्या  सभागृहात भरलेल्या या राष्ट्रिय संमेलनाचे उदघाटन  संघटनेचे संस्थापक  राष्ट्र अध्यक्ष संदिप काळे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून करण्यात आले.

या  प्रसंगी आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा, माजी महापौर जयश्री ताई महाजन, माजी उपमहपौर करीम सालार, काँगेस चे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ. ए.जी. भंगाळे, ऊर्दू वृत्तपत्र औरंगाबाद चे मुजतबा फारुकी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, डॉ.निलेश चांडक, एजाज मलिक, डॉ. शरीफ बागवान, नूतन जिल्हाध्यक्ष डिगम्बर महाले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, विनोद बोरे,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्यूम,सय्यद शब्बीर  आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.खडसे यांनी पत्रकार आणि पत्रकारिता ही सशक्त लोकशाही ची गरज असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कौतुक करून ऊर्दू भाषा ही देशाचीच भाषा असून या भाषेचे संवरधन गरजेचे असल्याचे सांगितले. आपल्या उदघाटन पर भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी संघटनेचे उद्दिष्ट स्पश्ट करीत सांगितले की, ही संघटना व्हिजन आणि मिशन घेऊन काम करीत असून देशभरातील ३७ हजार पत्रकार आता पर्यंत सक्रिय सभासद झाले असून  संघटानातर्गत वेगवेगळ्या विंग प्रभाविपणे काम करीत असून पत्रकारांचे जीवनमान उंचावण्यासह त्यांच्या कल्याणाचे ध्येय घेवून काम करीत आहे. ऊर्दू भाषिक पत्रकारांचे देशव्यापी सम्मेलन आयोजित करून त्यांच्या हित  रक्षनासाठी  कार्य करता यावे म्हणून स्वतंत्र विंग कार्यरत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी गेल्या दोन  वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर  करून ऊर्दू पत्रकारांचे स्वागत केले.

अध्यक्षीय भाषणात मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी ऊर्दू भाषिक पत्रकारांचे सम्मेलन भरविण्या मागचा उद्देश विषद करून आपल्या अधिकारांसाठी एकजुटीचे आव्हान करीत  व्हॉईस ऑफ मीडिया  या संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. ऊर्दू दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार  व संपादक मुजतबा फारुकी  यांनी श्री काळे आणि मुफ्ती साहेबांच्या कार्याची प्रशंसा करीत सांगितले की, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेमुळे ऊर्दू पत्रकाराना बळ प्राप्त झाले असून  आम्ही आता एकटे नाहीत,तर एक राष्ट्रव्यापी संघटना आमच्या पाठीशी आहे,याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी करीम सालार यांनी ही मनोगत व्यक्त केले. राज्या सह, गुजरात, मध्यप्रदेश,कर्नाटक, दिल्ली,आंध्रप्रदेश आदी विविध राज्यातून  सुमारे दोनशे पत्रकार या संमेलनात सहभागी झाले होते .

या  संमेलनात कॅन्सर रोग तज्ञ डॉ. निलेश चांडक यांच्यासह दोन ऊर्दू पत्रकारांचा गौरव करण्यात आला.आभार  रिजवान फलाही यांनी,तर सूत्रसंचालन मुश्ताक  करीमी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post