प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणेत येते. यावर्षी सन २०२३-२४ सालच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे .यामध्ये विविध क्रीडा प्रकाराच्या समावेश आहे.
या अनुषंगाने आज शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे महानगर पालिका स्तरावरील १४,१७ आणि १९ वर्षे वयोगटातील कब्बडी स्पर्धांचा शुभारंभ महानगर पालिकेच्या सहा.लेखापाल किरण मगदुम आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांच्या हस्ते करणेत आला. याप्रसंगी मुख्याध्यापक शंकर पोवार, प्रा.शेखर शहा, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेटे,सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, आकाश माने, गणेश बरगाले, विजय गुरव, राहुल कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण,मयुर चिंदे,सोनल बाबर, तुषार जगताप, कार्तिक बचाटे,अमर भिसे,सुमन पोवार, संगिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.