सौ. मेघा उळागड्डे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार जाहीर


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार नांदणी येथील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री सौ. मेघा धनपाल उळागड्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. 

कवयित्री सौ. मेघा उळागड्डे यांचे आजपर्यंत तीन कथासंग्रह व एक कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत त्यापैकी पाठराखीण या कथासंग्रहास त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्या आपली लिखाणाची आवड जोपासून ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी साहित्य मंडळातर्फे त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार झाल्याने त्यांचे साहित्य क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post