प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील माई बाल विद्या मंदिरची चौथीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु. स्मितल कृष्णात चौगुले हिला इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरुवर्य कै.वा.गो.गोगटे यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या बडींग टॅलेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नुकताच एका समारंभात तिला या पुरस्काराचे वितरण कोल्हापूरचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.सूर्यकिरण वाघ यांच्या हस्ते व प्रसिद्ध डॉ.एस.पी.मर्दा यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचा अगदी कमी वयात बडींग टॅलेंट पुरस्कार मिळवणारी कु. स्मितल चौगुले ही पहिलीच विद्यार्थ्यीनी ठरली आहे.सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गो.सि.ढवळे ,सर्व पदाधिकारी, व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत , उपमुख्याध्यापिका सौ.अश्विनी कांबळे ,माई महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा प्रा.सौ.निर्मला ऐतवडे , उपाध्यक्षा सौ.माधुरी मर्दा , सेक्रेटरी डॉ.सौ.मीना तोष्णीवाल,माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.शैला कांबरे ,वर्ग शिक्षिका सौ.रजनी घोडके ,पालक सौ.स्नेहलता चौगुले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल कु. स्मितल चौगुले हिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.