ऑल इंडिया मुस्लिम O.B.C. ऑर्गनायझेशन तर्फे जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुसा खलिफा : 

इचलकरंजी : - सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथे लोकशाही मार्गाने शांततेत सुरु असलेल्या उपोषणाला काही समाजकंटकांनी दगडफेक करुन चालू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची अमानुषपणे केलेल्या लाठी हल्याचा ऑल इंडिया मुस्लिम O.B.C. ऑर्गनायझेशन तर्फे तीव्र शब्दात निषेध करणेत आला. सदर हल्याची जबाबदारी घेऊन शासनातील जबाबदार लोकांनी तात्काळ राजीनामे द्यावीत आणि मराठा समाजाला न्याय देण्याची कृति करावी अशी मागणी करण्यात आली.सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम O. B. Cआर्गनायझेशन सदैव पठिशी राहिल.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी O.B.C. चे नेते मुसा खलिफा होते. यावेळी O.B.C. चे शहर अध्यक्ष अतिक समडोळे, समीर जमादार, असलम खलिफा, ताजुद्दिन खतीब यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक पार पाडली. सदर बैठकीत O.B.C. संघटनेचे तालुकेचे पदाधिकारी व इचलकरंजी शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



Post a Comment

Previous Post Next Post