माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागणी केलेली माहिती पारदर्शकपणे देणेबाबतचे धोरण ठेवा : आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेत येतो. राज्यातदेखील या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देवून व विविध उपक्रम राबवून, त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

या शासन  निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका स्तरावर माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्या दृष्टीने दिनांक २८ सप्टेंबर या दिवशी महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा. चित्रकला, निबंध, वक्तृत्व इ. स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करणेत येत आहे.

 या अनुषंगाने  दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी  महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता माहितीचा अधिकार या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. 

 सदर कार्यशाळेत उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्लाईडशोद्वारे माहिती अधिकार अधिनियमातील कायदेशीर बाबींची माहिती उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना विस्तृत स्वरूपात दिली. 

       मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सर्व विभाग प्रमुख तथा जन माहिती अधिकारी यांनी आपल्याकडे आलेल्या माहिती अधिकार अधिनियमातील अर्जदाराचे आपण स्वागत करावे जेणेकरून आपल्या कार्यालयाच्या कामकाजाबाबत सकारात्मकता निर्माण होईल.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शन ओमप्रकाश दिवटे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना माहिती अधिकार कामकाजा बाबत आपले अनुभव सांगितले तसेच माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्ज प्राप्त झालेनंतर सदर अर्जातील माहिती

देणेच्या प्रक्रियेसाठी चेक लिस्ट तयार केलेस अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. त्याचबरोबर उपस्थित सर्व जन माहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागणी केलेली माहिती पारदर्शकपणे देणेबाबतचे धोरण ठेवणेच्या सुचना दिल्या.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी केले.

   याप्रसंगी महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख तसेच माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत काम पाहणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  


          

Post a Comment

Previous Post Next Post