प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
खोतवाडी ता. हातकणंगले येथील ओंकार संभाजी खोत (वय 25),रा.हनुमान मंदिर शेजारी,खोतवाडी. या युवकांने काल दुपारी साधारणता अडीचच्या सुमारास हातकणंगले -जयसिंगपूर रेल्वे ट्रक वर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
काल ओंकार संभाजी खोत रा.खोतवाडी हे कामानिमित्त हातकणंगले येथे गेले होते. घरी येताना त्यांनी हातकणंगले - जयसिंगपूर रेल्वे ट्रकवर कटींगनच्या पुलावरती रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना साधारणतः अडीचच्या सुमारास निदर्शनास आली. आईवडील व नातेवाईकांचा आक्रोश पाहून लोकांना ही अश्रू अनावर झाले. घटनास्थळी हातकणंगले पोलीसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत.