माहेश्वरी सभे तर्फे पोलिसांना पौष्टिक आहार वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : प्रतिनिधी 

 गणेश विसर्जन मिरवणुकीत २४ तास कर्तव्य बजावणारे पोलीस निरोगी राहण्यासाठी तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम स्तूत्य आहे. यामुळे पोलीसांना बंदोबस्त काळात चांगला पौष्टिक आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा व सौ.सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट यांच्यातर्फे पोलिसांसाठी `तंदूरुस्त बंदोबस्त` हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी समीरसिंह साळवे यांच्याहस्ते व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री चंदनमल मंत्री, अखिल भारतीय माहेश्र्वरी महासभा कार्यसमिती सदस्य भिकुलाल मर्दा,राज्य युवा अध्यक्ष विनीत तोषणीवाल, महेश सेवा समिती अध्यक्ष नंदकिशोर भुतडा  या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन बंदोबस्तावरील पोलिसांना मिनरल पाण्याची बाॅटल, चिक्की व राजगीरा लाडू या पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम झाला.

माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले. गेल्या दहा वर्षापासून इचलकरंजी शहरात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीसांना पाठबळ व उर्जा देणारा हा उपक्रम ठरला आहे. यामुळे पोलिसांना बंदोबस्तावेळी तंदुरुस्ती मिळत आहे. यापुढेही हा उपक्रम राबविण्यासाठी सदैव तयार आहे, असे धूत यांनी यावेळी सांगीतले. पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा राजस्थानी पगडी, शाल, बुके देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पोलीस निरिक्षक प्रविण खानापूरे, सत्यवान हाके, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव लालचंद गट्टाणी, बजरंग काबरा, सुरेश दरगड, बालकिसन टुवाणी, रामनिवास मुंदडा,अशोक मंत्री, धनराज डालिया, हरीष सारडा, राधेशाम भूतडा, कमलेश राठी,रामअवतार भूतडा, मनोज सारडा आदी मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post