प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची माजी विद्यार्थिनी अश्विनी मळगे हिला नुकताच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले त्यानिमित्त तिचा श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले.श्रीमंत गंगामाई हायस्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर ,क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांनी ही अश्विनीला शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी,श्रीनिवास बोहरा यांच्या हस्ते कु. अश्विनी मळगे हिचा शाल, बुके व चांदीचे कडे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील, राजेंद्र मळगे, क्रीडा शिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, सुहास पोवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एस. शिंदे यांनी केले. ज्येष्ठ पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.