प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बुधवार दि. 27 सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे एनएसएस डे निमित्त एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसराची स्वच्छता केली.
प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. देशमुख व प्राचार्य डॉ.. पुरंदर नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधव मुंडकर, डॉ.रामेश्वर संकपाळ, डॉ. देवेंद्र बिरनाळे, डॉ.गणेश खांडेकर, प्रा. अभिजीत पाटील , प्रा. सौरभ पाटणकर, प्रा.एफ. एन. पटेल आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सचिन चव्हाण यांनी केले.