पर्यावरण पूरक गणेशोत्सव २०२३ च्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची शहापूर खण येथे दुसऱ्यांदा भेट

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणेत येतो. गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्याआवाहनानुसार शहरातील घरगुती तसेच काही सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन शहरातील शहापूर खणीमध्ये करणेत येते.

        या पार्श्वभूमीवर  शनिवार दि. ९ सप्टेंबर  रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहापूर खण येथे भेट देऊन  त्याठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता विषयक आणि इतर कामांची पाहणी करून घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्थित आणि विना अडथळा संपन्न व्हावे याकरिता सर्व अत्यावश्यक बाबींची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक यांनी सर्व संबंधित विभागांना दिलेल्या होत्या.

   या अनुषंगाने आज सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी पुन्हा शहापूर खण येथे भेट देऊन पाहणी केली. प्रथम भेटीप्रसंगी खणीमधील पाणी  शुद्ध राहण्यासाठी एरिएशन फाउंटन (कारंजा) बसविणबाबत  दिलेल्या सुचनेनुसार पाणी पुरवठा विभागाने खणीमध्ये बसविलेल्या कारंजाची पाहणी केली. या कारंजा मुळे खणीमधील पाणी स्वच्छ राहणार आहे. तसेच खण परिसरात झालेल्या स्वच्छता विषयक कामाची पाहणी करून स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

 याप्रसंगी शहापूर पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, पाणी पुरवठा अभियंता अभय शिरोलीकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक संजय भोईटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे आदी उपस्थित होते.

 

          

Post a Comment

Previous Post Next Post