इचलकरंजी महानगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे वंदे मातरम क्रीडांगणाला दरवाजाच नाही. ..

क्रीडांगणाला दरवाजा नसल्याने संबधीत ठेकेदाराची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी  


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  : श्रीकांत कांबळे

मानवी आयुष्यामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण विविध प्रकारचे खेळ खेळत असतो जगभरात विविध खेळाच्या स्पर्धा होत आसतात  त्यात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात जसे क्रिकेट. फुटबॉल, हॉकी, टेनिस, खो.खो, कबड्डी,इत्यादी.खेळ खेळल्यामुळे आपले शरीर निरोगी, सुदृढ बनले जाते. तसेच आपल्या परिसरातील सर्वोत्तम क्रीडापटू तयार व्हावा यासाठी क्रीडांगण तयार केलेली  असतात. 


परंतू इचलकरंजी महानगरपालिकेच्या शेजारीच  वंदे मातरम क्रीडांगण असून सदर क्रीडांगण देखभाल,स्वच्छतेकडे  इचलकरंजी महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने क्रीडापटू कडून तीव्र  नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच सदर क्रीडांगणाची साफसफाई न झाल्याने सगळीकडे कचराच कचरा झाला आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन  नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच दरवाजा नसल्यामुळे भटक्या कुत्र्याचा व जनावरांचा सर्रास वावर दिसून येत आहे त्यामुळे  सकाळी. संध्याकाळी फिरायला येणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीमध्ये तसेच नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच  देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेसाठी  महानगरपालिकेकडून  लाखो रुपयांचा खर्च करूनही  क्रीडांगणाला दरवाजा नसल्याने संबधीत ठेकेदाराची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी  नागरिकांच्यातुन व क्रीडापटूकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post