प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी (प्रतिनिधी) : -
माणकापूर ता. निपाणी येथील निसर्गराजाग्रुपचे अध्यक्ष व दैनिक महासत्ता वार्ताहर मा. शिवाजी येडवान यांना नुकताच प्रेस मिडिया लाईव्ह, पुणे यांचे वतीने "राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार" मिळालेबद्दल आणि "स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती, दिल्ली" या संघटनेच्या "बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष" पदी नियुक्ती झाले बद्दल सुप्रसिद्ध "जादुगार स्टार- विलास कांबळे"- तारदाळकर, अतिग्रे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी मराठी चित्रपट अभिनेते व निर्मिती व्यवस्थापक- मा. लालचंद पारिक, इचलकरंजी; दैनिक ग्रामदेवता व दैनिक परतगंगाचे संपादक- मा. सखाराम जाधव; मा. अमोल माळगे, कु. मोनिका जाधव, कु. भुमि जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.