प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी कर विभागाकडील अभिलेखांचे वर्गीकरण करणेचे आदेश मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांना दिले होते.
या अनुषंगाने मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या मार्गदर्शनानुसार आणि कर अधिकारी स्वप्निल बुचडे यांच्या नियंत्रणाखाली कर विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी शनिवार दि.९ सप्टेंबर आणि रविवार दि.१० सप्टेंबर हे दोन दिवस कार्यालयीन कामकाजाच्या सुट्टी दिवशी कर विभागाकडील अभिलेखांचे वर्गीकरण करणेचे त्याचबरोबर कर विभागाच्या स्वच्छतेचे काम सुरू केले होते.
आज रविवार दि.१० सप्टेंबर रोजी आयुक्त तथा प्रशासक यांनी महानगरपालिकेच्या कर विभागास भेट देऊन या कामाची पाहणी केली आणि कर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
त्याचबरोबर कर विभागाचे नाविन्यपूर्ण कामकाज पाहुन महानगरपालिकेच्या इतर सर्व विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांनी यापासुन प्रेरणा घ्यावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले.