प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : ३१ ऑगस्ट २०२३ रोजी महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते.
१) संजय हातळगे. (३४ वर्षे)
२) संजय भोसले (३६ वर्षे)
३) ज्ञानेश्वर बारवाडे (२८ वर्षे)
४) प्रमोद शिर्के. (२६ वर्षे)
५) नेताजी आवळे (३३ वर्षे)
या अधिकारी कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते करणेत आला. याच वेळी कर्मचाऱ्यांच्या कामगार कल्याण सेवक मंडळाकडून देय असलेल्या रक्कमेचे तसेच यामधील काही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या देय रकमेचे धनादेश देण्यात आले.
तसेच या पुढे ज्या दिवशी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतील त्याच दिवशी सदर कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमेचे धनादेश देण्यात यावेत असे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित विभागास दिले.
याप्रसंगी विविध विभाग प्रमुख,कामगार संघटना प्रतिनिधी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.