प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्यातील अनूसुचीत जाती समुहातील भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनला पाहिजे या आग्रही मागणी करीता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली दोन ऑक्टोंबर 2023 रोजी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भूमिहीनांचे सत्याग्रह आंदोलन72 तास उपोषण करणार असल्याची माहिती पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक दातार यांनी दिली
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील दारिद्र्यरेषेची अट रद्द करावी .या योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून भूमीहिंन शेतमजुरांना बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी राज्यातील महसूल पडीक जमीन इनाम जमीन सैनिकी जमीन 32 ग प्रकार जमीन राज्य शासनाने खरेदी करून लँड बँक तयार करावी व पात्र भूमीहिनांना देण्यात यावी. पूर्वीच्या काळी राजे राजवाडे यांनी दलित, अनुसूचित जाती समाजाच्या गटसमूहाला शेत जमिनी दिल्या होत्या उदाहरणात माहरकी, महार वतन ,हडकी परंतु त्यांचे सध्या वंश वाढल्याने व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या जमिनीचे रूपांतर एक ते पाच गुंठेच्या मालकीचे झाले आहे या जमिनीवर त्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होत नाही. तसेच त्या जमिनीत कसता येत नाहीत त्यामुळे एक ते पाच गुंठ्याच्या जमीन मालकांना इतरांच्या शेतावर शेतमजूर करून आपले दरिद्री जीवन जगावे लागत आहे .अशा एक ते पाच गुंठ्याच्या भूधारकांना भूमीहीन म्हणून घोषित करावे व योजनेचा लाभ घ्यावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी आई-वडील पती-पत्नी यांच्या नावे 25 वर्षांपूर्वी शेतजमीन नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करावी भूमिहीन शेतमजूर दाखला तहसीलदाराने कोणत्या निकषाने द्यावा याचा आदेश अध्यापित तलाठी व तहसीलदार यांना शासनाने दिलेले नाहीत तर भूमिहीन ठरवण्याचा निकष शासनाने त्वरित जाहीर करावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांना भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला त्याच गावातील शेतकऱ्याकडून घेण्याची अट रद्द करावी या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रधान क्रमाचे अट रद्द करून जिल्ह्यात कुठेही जमीन खरेदी करून देण्याची मुभा देण्यात यावी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील पूर्वी लाभ घेतलेल्या भूमीहीन शेतमजुरांना त्यांच्या जमिनीचे कर्ज माफ करावे प्रतिवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने प्रतिवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करावी वरील
मागण्यांकरीता इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर 2023 पासून 72 तास उपोषण करणार असल्याची माहिती इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष त्रिंबक दातार व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.