इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद



प्रेस मीडिया लाईव्ह : 

   महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी महानगर पालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी शहापुर खण तसेच शहरातील सर्वच प्रभागामध्ये  जवळपास ७३ ठिकाणी सुंदर रित्या फुलांची सजावट केलेले कृत्रिम गणेश मूर्ती  विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था करणेत  आलेली होती.  महानगरपालिकेच्या  वतीने ठेवणेत आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेस इचलकरंजी शहरवासीयांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. 

    

   महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाना भेट देऊन पाहणी केली. तसेच गणेश विसर्जन सोहळ्यात उस्फुर्त पणे सहभागी होवुन गणेश भक्तांना शुभेछा दिल्या. यावेळी सर्वच ठिकाणी उपस्थित असलेल्या गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी महानगर पालिकेच्या वतीने केलेल्या शहापूर खण तसेच शहरातील विविध ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

       आज दिवसभरात इचलकरंजी शहरवासीयांनी  जवळपास १२००० गणेश मूर्तींचे विसर्जन  कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खण येथे करून तसेच जवळपास १४ टन निर्माल्य जमा करून  महानगरपालिका प्रशासनाने  पर्यावरण पुर्वक गणेशोत्सव साजरा करणेसाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. आजच्या या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्या करिता महानगरपालिकेकडुन ....

१ क्रेन,  २ यांत्रिक बोटी,  २ अग्निशमन वाहने, ३ रुग्णवाहिका , १६ आयशर टेंपो, ५ ट्रॅक्टर यासह महानगरपालिकेचे  सहा आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, वित्त व लेखाधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार विद्युत अभियंता संदीप जाधव, सहा लेखापरीक्षक दिलीप हराळे, नितिन सरगर, राधिका हावळ, सचिन पाटील, नितिन देसाई, विजय पाटील, संजय भोईटे, मंगेश दुरुगकर, सुर्यकांत चव्हाण, रफिक पेंढारी, महादेव मिसाळ, संजय कांबळे, सुभाष आवळे यांचेसह सर्व विभाग प्रमुख, प्रशासन अधिकारी अजयकुमार बिरनगे , शिक्षक- शिक्षिका,  स्वच्छता निरीक्षक -पर्यवेक्षक, वॉर्ड इन्स्पेक्टर यांचेसह जवळपास ६५० अधिकारी- कर्मचारी ,१५० स्वयंसेवक तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आणि एन.यु.एच.एम.विभागाकडील वैद्यकीय पथक  संपूर्ण दिवस कार्यरत होते. त्याचबरोबर प्रत्येक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या शहरातील पोलिस बॉईज, आधार फौंडेशन इचलकरंजी,वीर रेस्क्यु फोर्स, माणुसकी फौंडेशन इचलकरंजी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

           तसेच महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त तथा  प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेसह उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी पुर्णवेळ लक्ष ठेवून होते तर मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांनी स्टार नगर येथे स्वतः गणेश मूर्ती विसर्जन करणेच्या कामात सहभागी होवुन त्याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. महानगरपालिकेकडून करणेत आलेल्या पर्यावरणपुर्वक गणेशोत्सवाच्या या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देवुन सहकार्य केल्याबद्दल  आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहर वासीयांचे आभार व्यक्त केले आहे.


            

Post a Comment

Previous Post Next Post