इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंचगंगा नदी घाट स्वच्छता मोहिम मोठ्या उत्साहात संपन्न.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रिय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार मार्फत स्वच्छ पंधरवडा उपक्रम राबविणेबाबतचा एक भाग म्हणून इंडियन स्वच्छता लीग २० स्पर्धेची घोषणा केलेली आहे.

 या स्पर्धेसाठी आपल्या सर्व शहरवासीयांच्या सहभागातून इचलकरंजी महानगरपालिकेकडुन *स्वच्छता चॅंम्पियन इचलकरंजीकर* या नावाने आपल्या शहराच्या टिमची नोंदणी शासनाच्या पोर्टलवर केलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये इचलकरंजी शहर कचरामुक्त करणेसाठीच्या कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनीधी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी यांचेसह शहर वासीयांच्या आणि महानगर पालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातून दि.१७ सप्टेंबर रोजी पंचगंगा नदी घाट स्वच्छता मोहिमेचे आयोजन  करणेत आले होते. या मोहिमेत संपूर्ण पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता करुन उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेतली.   

आजच्या या स्वच्छता मोहिमेत आमदार प्रकाशराव आवाडे, माजी नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष संजय दादा कांबळे, प्रकाश मोरबाळे, रवी रजपुते, बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक राहुल खंजीरे, महादेव गौड, गजानन महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

         तसेच वित्त व लेखाधिकारी विकास खोळपे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, लेखा परिक्षक दिलीप हराळे,रवी जावळे, अभिजित पटवा, उमेश पाटील, उदय निंबाळकर, माणुसकी फौंडेशन, अमृता भोसले फौंडेशन, इचलकरंजी नागरीक मंच, पोलिस बॉईज, फिनिक्स इन्फोटेक,वीर रेस्क्यु फोर्स, आधार फौंडेशन,वरद विनायक बोट क्लब, पंचगंगा जलतरण मंडळ,तेजोनीधी रेस्क्यु फोर्स, संजय कांबळे युवा मंच, चौडेश्वरी युवा फौंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मॉ अंबे साप्ताहिक मंडळ, युवा मंच गावभाग, दीपस्तंभ युवा मंच,संत नामदेव युवक संघटना या सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या स्वच्छ पंधरवड्यात इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व शासकीय निमशासकीय विभागांचे, त्याचबरोबर सर्व पक्षांचे पदाधिकारी,सर्व सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी यांचे  सहभागी करून घेणेत येणार आहे. 

    तरी शहरातील सर्व शासकीय निमशासकीय विभागांचे अधिकारी, विद्यमान लोक प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होवुन आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.


(या स्वच्छता पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे, त्या सर्व कार्यक्रमात सहभाग नोंदविणेसाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा ही विनंती)


लिंक-

https://innovateindia.mygov.in/islseason2/ 




        

Post a Comment

Previous Post Next Post