प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते आणि मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहा. आयुक्त केतन गुजर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, विद्युत अभियंता संदीप जाधव, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे , रेकॉर्ड किपर संजय सुभेदार,प्रविण बोंगाळे, वॉर्ड इन्स्पेक्टर संदीप मधाळे, रमेश बन्ने,अविनाश रंगाटे, योगेश कोंडेकर, सचिन शेडबाळे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.