प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी प्रतिनिधी :
इचलकरंजी शहरातील जुना बस स्टॅन्ड येथे बाळूमामा हॉटेल समोर नव्यानेच एम एस इंटरप्राईजेस या फोर व्हीलर गाड्यांचे सर्वच स्पेअर पार्ट्स व नामवंत कंपन्यांचे ऑइल एकाच छताखाली योग्य दरात मिळण्याचे एकमेव दुकानाचे भव्य उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 30/09/2023 रोजी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. धोंडीलालजी शिरगावे साहेब यांच्या शुभहस्ते व मा.श्री. लतीफ गैबान, मा.श्री. राजू बोंद्रे , मा.श्री.जहांगीर पट्टेकरी, मा.श्री.मनोज साळुंखे, मा.श्री. कैस बागवान,मा.श्री.पापा वस्ताद, मा.श्री. युसुफ तासगावे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अनेक फोर व्हीलर मिस्त्री, व्यापाऱ्यांनी व मित्रपरिवाराने दुकानचे मालक साद रफिक तेलसंग यांना शुभेच्छा दिल्या. विविध प्रकारच्या गाड्यांचे, कंपन्यांचे, व्हरायटीचे सर्वच स्पेअर पार्ट्स दुकानात उपलब्ध असल्यामुळे इचलकरंजी वासियांना एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आवाहन दुकानचे मालक साद तेलसंग व रफिक तेलसंग यांनी केले.