गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :  महालक्ष्मी नगर येथील गटारीची तात्काळ दुरुस्ती करावी,अशी मागणी भागातील नागरिकांनी केली. मागणीचे निवेदन भाजपा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. पुनम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त डॉ  प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे गटारींची झालेली दुरवस्था आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेल्या आरोग्य याची भीषणता महापालिका प्रशासनाला दाखवून दिली.

महालक्ष्मी नगर येथे गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे याठिकाणी साथीचे आजार वाढत असून परिसरात ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला या साथीचे आजारानी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेंगी, मलेरियाने तर नागरिक हैराण झाले आहेत.अशी विदारक स्थिती असताना महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ (२४ वार्ड) मध्ये येणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत  गटारचीहे काम अर्धवट आहे. 

सध्या या परिसरामधील दुर्गंधीयुक्त पाण्याने गटार पूर्ण भरून ते पाणी चेंबरमधून बाहेर येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे. विशेष म्हणजे गटाराच्या मुख्य रस्त्यावर हे सांडपाणी साचल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने गटार दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. पाणी रस्त्यावर असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. घरातून बाहेर पडताच गटाराच्या पाण्यातून जावे लागते.  शाळकरी मुले यातूनच जातात. पाण्याचा वास, सर्वत्र घाण, यामुळे अनेक जण आजारी पडले आहेत. याबाबत तक्रार केली की तात्पुरती उपाययोजना  करत आरोग्य विभागाकडून  केवळ साफसफाई केली जाते.त्यामुळे तात्काळ गटार दुरुस्तीचे टेंडर काढून कायमचा मार्ग काढावा, अशी मागणी केली. यावेळी लवकरच टेंडर काढून गटारीचे काम करण्याचे आश्वासन उपायुक्त डॉ. ठेंगल यांनी दिले. 

आज महापालिका चे सफाई बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी अक्षरशा बादलीने गटारीतील पाणी काढून सफाई करत होते. 

या वेळी भागातील नरेंद्र बगरेचा, संजय खोत, प्रकाश जाधव,सागर कुंभार, शिवाजी चौथे, गणेश पाटील, आनंदा मस्के, शंकर इनामदार,रशिद शेख,सुनिल आमने,सावकार गोसावी, महेबुब शेख, रियाज अन्सारी, सौ जाधव सौ पाटील,सौ ,खोत सौ पाटील व भागातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post