प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : झिका व्हायरसच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज संहारैगुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी इचलकरंजी महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य किटकसंहारक डॉ.महेंद्र जगताप आणि डॉ.मानकर यांनी भेट देऊन शहरातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच झिका व्हायरसच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सुचना महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
यावेळी महानगरपालिका उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल, उपायुक्त तैमूर मुलांनी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, डॉ.तौषी,साथरोग कक्ष, कोल्हापूर, डॉ.विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी, कोल्हापूर,डॉ.कांबळे सहा. हिवताप अधिकारी यांचेसह जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील मलेरिया विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.