प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील बंगला रोड सिटी सेंट्रल हॉल, देवनाळ बिल्डिंग, काँग्रेस कमिटी जवळ, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सिव्हिल बोर्ड चे अध्यक्ष मा.श्री इरगोंड (दादा) पाटील यांनी भुषविले .अध्यक्ष निवडीसाठी सूचक म्हणून श्री शंकर बिळ्ळूर यांनी सुचविले.
त्यास अनुमोद उमेश पाटील यांनी दिले स्टेज वरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धांजलीचा ठराव श्री लक्ष्मण पाटील सर यांनी मांडला कै. बाळासाहेब देवनाळ व नुकत्याच चंद्रयान 3 च्या शास्त्रज्ञ व समाजांतील व्यक्ती व सेमीचे रक्षण करणारे सैनिक जवान या सर्वांना श्रद्धांजली वाहून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत श्री उमेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री शिवकुमार मुरतले यांनी केले .
वीरशैव उत्कर्ष मंडळ चे सिव्हिल बोर्ड चे अध्यक्ष माननीय श्री इरगोंडा दादा पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले यांनी केले. दुसरे मान्यवर सिव्हिल बोर्ड चे सदस्य ज्येष्ठ उद्योजक माननीय श्री डी एम बिराजदार साहेब यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेश जमदाडे यांनी केले. तिसरे मान्यवर वीरशे उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांचा सत्कार श्री शंकर बिळ्ळूर यांनी केला. यानंतर वीरशे उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी उमेश कमतगी यांनी केले.
यानंतर गौरव प्राप्त सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला प्रथम सी.ए. परीक्षेत चांगल्या तऱ्हेने यश संपादन करून यशस्वी झाल्याबद्दल श्री सन्मित्र संजय कोले यांचा सत्कार सिव्हिल बोर्ड चे अध्यक्ष इरगोंडा (दादा) पाटील यांनी केले. बसवेश्वर पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल सिव्हिल बोर्ड चे सदस्य मा.श्री. डी. एम. बिराजदार साहेब यांनी सी.ए. श्री सुशांत देवनाळ यांचा सत्कार केला. 3 कामगार युनियन दिल्ली या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री.मल्लिकार्जुन बिळ्ळूर यांचा सत्कार वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सिविल बोर्ड अध्यक्ष मा. श्री.इरगोंड (दादा) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 4. श्री मुकुंद माळी साहेब यांची महाराष्ट्र कॉमर्स ऑफ एग्रीकल्चर चेंबरच्या & ऊर्जा संवर्धन या राष्ट्रीय पातळीवरील संचालक पदी निवड झाल्याबद्दल वीरशैव उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मा.श्री. शिवबसु खोत यांची रोटरी प्रोबेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिविल बोर्ड चे सदस्य मा. श्री डी एम बिराजदार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
6.श्री.अमित सुरेश गाताडे यांची इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस (दादा गटाच्या) शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार वीरशैव उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सन्मित्र कोले यांनी आज झालेल्या बीजारोपणाचे वटवृक्षांमध्ये रूपांतर व्हावे अशी शुभेच्छा व्यक्त केली. दुसरे सत्कारमूर्ती सुशांत देवनाळ यांनी संस्थेच्या सर्व कामांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्री मुकुंद माळी साहेब यांनी. या संस्थेच्या उत्कर्षासाठी कोणत्याही प्रकारची मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्री शिवबसू खोत यांनी 51 सभासद करून या महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला विविध माध्यमातून पुढे नेण्याचे आश्वासन दिले.
श्री अमित गाताडे आणि संस्थेसाठी व समाज्यासाठी कोणत्याही व्यक्तीसाठी कोणतेही काम असू दे मी ते तत्परतेने पूर्ण करणे ची ग्वाही दिली.
यानंतर माननीय श्री डी एम बिराजदार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये खूप संयम व पारदर्शकपणा असणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर वीरशैव उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांनी या नवीन तरुण पिढीकडून चांगल्या रीतीने काम करून समाजाचा उत्कर्ष करून घ्यावे या सर्वांमध्ये काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे त्याचा वापर संघटना व संस्था वाढीसाठी करण्यात यावा अशी उद्गार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सिव्हिल बोर्ड अध्यक्ष मा. श्री. इरगोंड (दादा) पाटील यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले अशा पद्धतीने समाजाला दिशा देण्याचे काम आपल्या सर्वांच्या हातून घडो व ही संस्था आपल्या शेखर संस्थेची सलग्न राहून काम करण्याचे मनोदय व्यक्त केले. पुढील काळात आपणास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आभार संस्थेचे श्री सुरेश जमदाडे यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे तसेच सर्व समाज बांधवांचे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे, हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल देवनाळ कुटुंबीयांचे आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवकुमार मुरतले, उपाध्यक्ष श्री. सुरेश जमदाडे, सचिव श्री. उमेश कमतगी, खजिनदार श्री लक्ष्मण पाटील, सदस्य श्री दीपक हिंगमिरे, श्री बाळासाहेब पाटील, श्री संतोष पाटील, श्री.उमेश पाटील, श्री. शंकर बिळ्ळूर, श्री सुनील चिंगळे, श्रीमती छाया पाटील, सचिन मडिवाळ, सचिन देशमाने, शशिकांत पाटील, दिलीप पाटील, मलाबादे, लंबे, महेश कब्बूर, सुनील चचडी, स्नेहबंध बचत गट व भिशी परिवार, तसेच रुद्र भूमिका मीटिंग सर्व पदाधिकारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण पाटील सर यांनी केले.