प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
प्रेस मीडिया लाईव्हच्या तिसर्या वर्धापनदिना निमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दि.20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथील आझम कॅम्पस येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्हय़ातील समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा सत्कार प्रेस मीडिया लाईव्ह पुणेच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या मध्ये इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवराज चुडमुंगे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मा.श्री महेबूब सर्जेखान व इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते व आधार लायब्ररीचे उपाध्यक्ष मा.श्री. युसूफ तासगांवे यांच्या हस्ते अॅड. शिवराज चुडमुंगे यांना काल सन्मानचिन्ह, मानपत्र, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कांबळे , कैलास कांबळे बरकत मुजावर उपस्थित होते.