प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने संभाव्य संसर्ग रोखण्या साठी आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग यांचेकडून युद्ध पातळीवर करणेत येत आहेत. सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य स्तरावरुन विविध मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने काल महाराष्ट्र राज्य किटक संहारक डॉ.महेंद्र जगताप यांनी इचलकरंजी शहरास भेट देऊन शहरातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच या अनुषंगाने संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी डॉ जगताप जगताप यांनी आज शहरातील सर्व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,आशा वर्कर यांचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.
या बैठकीच्या प्रारंभी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आपण सर्वांनी आपणांवर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडावी जेणेकरून शहरात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा सामना योग्य पद्धतीने करता येईल असे आवाहन उपस्थित सर्व शासकीय , महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि आशा वर्कर यांना केले.
याच अनुषंगाने आज शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन करणेत आले होते.
सदर बैठकीत शासन स्तरावरून देणेत येत असलेल्या संशयित झिका रुग्णांच्या बाबतीत घ्यावयाच्या दक्षतेबाबतची सविस्तर माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांनी विषद केली
या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड, डॉ.हर्षला वेदक, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.बी. देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी. एस.दातार, डॉ.अमित सोहणी, एन.यु.एच.एम.कडील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेसह जिल्हा हिवताप विभागाकडील कर्मचारी , शहरातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.