इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने झिका व्हायरसच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना


प्रेस मीडिया लाईव्ह :

      इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने झिका व्हायरसच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेत येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुर फवारणी,औषध फवारणी, पाण्याच्या साठ्या मध्ये औषध टाकणे अशा विविध आवश्यक उपाययोजना करणेत येत आहेत.

 तथापि या अनुषंगाने सद्यस्थितीत याबाबत नागरिकांची जनजागृती आणि प्रबोधन होणे अत्यंत आवश्यक असलेने महानगरपालिका आरोग्य विभाग,नागरी आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचेकडुन नागरिकांची जनजागृती करणेत येत आहे.परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे या दृष्टीकोनातून सुद्धा विविध उपाययोजना करणेत येत आहेत. याकरिता शुक्रवार दि. १५ सप्टेंबर रोजी शहरातील बचत गटाच्या महिलांची बैठक घेऊन त्यांना जनजागृतीसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले होते. या महिलांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागातील नागरिकांची जनजागृती करणेसाठी रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी संपुर्ण शहरात जनजागृती मोहीम हाती घेणेत येणार होती.

           तथापि इचलकरंजी शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणेत येत असल्याने संपूर्ण शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे.

महिला वर्ग सुद्धा या उत्सवात मोठ्या प्रमाणात  सहभागी होत असल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती करणे कामी मर्यादा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  यामुळे सदर जनजागृती मोहीम घरगुती गौरी गणेश विसर्जन पर्यंतच्या कालावधी साठी तुर्तास स्थगित करणेत येत आहे.

तथापि डेंग्यू, चिकुनगुनिया या सारख्या आजाराच्या प्रतिबंधा साठी शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ धुतल्या नंतर कापडाने पुसूनच पुन्हा त्यामध्ये पाणी भरावे आणि नंतर ते भांडे कपड्याने  झाकून ठेवावे जेणेकरुन इडीस  डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही

याची योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे. तसेच सदर स्थगित करणेत आलेली जनजागृती मोहीमे विषयी कळविणेत येईल.

 


         नितिन प्र.बनगे

माहिती व जनसंपर्क अधिकारी

इचलकरंजी महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post