प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे महानगरपालिकेच्या विविध विभागांना अचानक भेट देऊन पाहणी करत असतात. या अनुषंगाने रविवार दि.१० सप्टेंबर रोजी सायंकाळी शहीद भगतसिंग उद्यान येथे अचानक भेट देऊन उद्यानाची पाहणी करून उद्यानामध्ये काही ठिकाणी गाजर गवत आणि तणकट वाढलेचे तसेच ज्या झाडांचे कटींग करणे आवश्यक आहे त्या झाडांचे कटींग केले नसल्याचे निदर्शनास आलेने त्यांनी तात्काळ उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर यांच्याशी संपर्क साधून उद्यानामध्ये वाढलेले गाजर गवत तातडीने काढून टाकण्याचे आणि झाडांचे योग्य पद्धतीने कटींग करून घेणेचे सक्त आदेश दिले. त्याचबरोबर या कामाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या वरदंडात्मक कारवाई का करू नये याबाबतची नोटीस बजावण्याचे आदेश देऊन शहरातील महानगर पालिकेच्या सर्वच उद्यानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणेच्या सुचना उद्यान पर्यवेक्षक यांना दिल्या.
याप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उद्याना मध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेऊन महानगरपालिकेच्या सर्वच उद्यानामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.