प्रेस मीडिया लाईव्ह :
झिका व्हायरसच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दि.९ सप्टेंबर रोजी इचलकरंजी शहरास डॉ.प्रणव ज्योती भुयाण, सह संचालक आरोग्य मंत्रालय, दिल्ली, डॉ.एन.के.जॉन्सन, किटकशास्त्रज्ञ राष्ट्रीय किटकजन्य आजार संशोधन केंद्र दिल्ली, डॉ.अपुर्वा कुलश्रेष्ठ , प्राध्यापिका स्त्रीरोग प्रसुती विभाग, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय दिल्ली यांच्या केंद्रीय पथकाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय तसेच ज्या ठिकाणी झिका व्हायरस रुग्ण आढळले आहेत त्या परिसरात भेट देऊन शहरातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन महानगरपालिका सभागृहात शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन संशयित रुग्णांवर उपचार पद्धतीचे प्रशिक्षण दिले.
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी झिका व्हायरसच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी राज्य किटक संहारक डॉ.महेंद्र जगताप,सह संचालक डॉ माने, डॉ.मानकर पुणे , डॉ.सावंत किटक तज्ञ पुणे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड,वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.बी. देशमुख, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणविर, डॉ.रेंदाळकर मॅडम साथरोग कक्ष, डॉ.तौषी साथरोग कक्ष, कोल्हापूर, डॉ.विनोद मोरे,जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर, डॉ.कांबळे सहा. हिवताप अधिकारी, यांचेसह जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.