प्रेस मीडिया लाईव्ह :
हुपरी : प्रतिनिधी :
येथील ॲडव्होकेट एल. एस. सद्रेकर यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी वकील परीक्षेत चांगले यश संपादन केले.त्यामुळे त्यांची सहाय्यक सरकारी वकील पदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचा हुपरी वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ॲडव्होकेट एल. एस. सद्रेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सहाय्यक सरकारी वकील पदापर्यंत मजल गाठली आहे.त्यांचे हे यश विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.त्यांच्या सत्काराप्रसंगी ॲड.आर. एस. सुतार , ॲड. एल. जी. गायकवाड ,ॲड.एस. एम. कदम, ॲड.एस. माने, ॲड. परीट मॅडम , ॲड. के.एस.कमते, ॲड.लखन रजपूत ,ॲड. श्री.ठोंबरे ,ॲड. श्री. नदाफ यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.