प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
हेरले (तालुका- हातकणंगले ) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर गळीत धान्य पिके उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम अभियान योजनेअंतर्गत शेतकरी पीक परिसंवाद शेतकरी शेतीशाळाचे आयोजन विठ्ठल मंदिर माळवाडी भाग हेरले येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री परीट कृषी अधिकारी हातकणंगले हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राहुल शेटे लोकनियुक्त सरपंच हेरले हे लाभले.
सदर कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्ते व मार्गदर्शक श्री परीट कृषी अधिकारी हातकणंगले म्हणाले की बदलते ऋतुमान व बदलत्या हवामानामुळे पिकांवर होत असलेल्या प्रभावामुळे शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे , कामगंध सापळे यांचा वापर करून किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे व कीड रोगाचे संवर्धन करने गरजेचे आहे असे ते म्हणाले.
तदनंतर सदर कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक श्री आलमने साहेब म्हणाले की कामगंध सापळे लावल्याने निश्चितपणाने सोयाबीन पिकामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कीड रोग प्रभावीपणाने करता येते व पीक वाडीच्या अवस्थेमध्ये योग्य त्या औषधांचा वापर करून की रोगाचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
शेवटी अध्यक्षिय भाषणामध्ये श्री राहुल शेटे लोकनियुक्त सरपंच हेरले म्हणाले की बदलते ऋतुमान तसेच हवामान या सगळ्या गोष्टींचा विचार करता निश्चितपणाने सुधारित शेती पद्धती यांचा अवलंब करून शेती करणे गरजेचे आहे. पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे त्याकरिता ठिबक सिंचनचा प्रामुख्याने शेतकऱ्यांनी अवलंब करावा यावर ते आग्रहाने बोलले.
सदर कार्यक्रमास हेरले येथील प्रगतशील शेतकरी श्री श्री दादासो कोळेकर, श्री अंबादास कोळेकर, श्री प्रकाश कारंडे श्री संतोष भोसले, श्री सयाजीराव गायकवाड श्री अमित पाटील ग्रामपंचायत सदस्य मौजे हेरले व अन्य प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश सकटे कृषी अधिकारी हेरले यांनी तर आभार श्री सयाजीराव गायकवाड अध्यक्ष जयराज कृषी विज्ञान मंडळ हेरले यांनी केले.