प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले / संभाजी चौगुले .
कोल्हापूर (बावडा ) येथे आरोग्य केंद्रामध्ये जिल्ह्यातील सर्व चालक-मालक यांची मोफत आरोग्य तपासणी त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदरचे शिबिर हे ३१/०८/२०२३ ते०४/०९/२०२३ पर्यंत पार पडले. सदरचे असे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी ही येवढ्या मोठ्या प्रमानात आणि ते ही ड्रायव्हर व वाहन मालक यांच्या साठी भरवण्यात आले आहे. सदरचे शिबिर हे प्रदेशिक परिवहन विभागाचे अधीक्षक मा श्री दीपक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आले होते. या साठी जिल्ह्यातील सर्व चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे
या शिबिरात आरोग्य तपासणी करून गरज असेल तर पुढील उपचार सुद्धा आमच्या मध्यमातून करून देऊ असे आश्वासन मा श्री दीपक पाटील यांनी दिले.
या वेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधीक्षक माननीय श्री दीपक पाटील, पोलीस निरीक्षक- अतुल नांदगावकर, पोलीस निरीक्षक- ज्योती पाटील, पोलीस निरीक्षक- मंगेश गुरव, पोलीस निरीक्षक- गणेश मलके, रोटरी क्लबचे अमोल घोडके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- किरण पाटील (मामा), ड्रायव्हर चालक-मालक असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर चांदेकर, संभाजी पाटील, गफार मनेर, हरिश्चंद्र इकवडे , तसेच सर्व चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते