अतिग्रे तालुका हातकलंगले साईराज मंगल कार्यालय अतिग्रे ,
प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
येथे चोकाक ,माले, मालेवाडी ,हेरले ,अतिग्रे ,रूकडी ,माणगाव, माणगाव वाडी ,मुडशिंगी ,या गावातील गणेश उत्सव साजरा करणारा सर्व तरुण मंडळ अध्यक्ष सदस्य तसेच सदर गावातील सरपंच उपसरपंच यांच्या समवेत गणेश उत्सव संदर्भात मीटिंग पार पडली .
यावेळी बोलताना माननीय रविंद्र भोसले साहेब यांनी सर्व मंडळांना अनुमोदन केले की प्रथमता सर्वांनी रीतसर पोलीस स्टेशन ची कागदपत्रे परवानगी घेणे गरजेचे आहे कागदोपत्री परवानगी घेणाऱ्या मंडळास डॉल्बी लावण्यास परवानगी भेटणार आहे डॉल्बी चालक यांच्याबरोबर आमची रीतसर मीटिंग होणार आहे डॉल्बी चालक यांना पोलीस स्टेशन कडून अशी सूचना असणार आहे की ज्या मंडळांनी रीतसर कागदपत्रे परवानगी घेतली आहे त्या मंडळास डॉल्बी लावण्यात यावी व डॉल्बी चा आवाज कमी करून लावण्यात यावी व वेळेत त्याचे नियमांचे पालन करण्यात यावे लाईटची परवानगी रीतसर एम एस ई बी यांच्याकडून घेण्याची आहे मंडप रोड वरती घालू नये व रोडवरती खड्डे पाडू नयेत जेणेकरून त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये त्या संदर्भात पीडब्ल्यूडी यांच्यासमवेत मीटिंग घेतली जाणार आहे असे सांगण्यात आले
। यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माननीय रवींद्र भोसले साहेब यांचे रोपटे देऊन अतिग्रे, माले ,रुकडी ,गावचे सरपंच, हेरले गावचे पोलीस पाटील नयन पाटील ,,अतिग्रे तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,रूकडी माजी सरपंच एडवोकेट अमित कुमार भोसले, सर्व गावातील ग्रामपंचायत सदस्य ,व मंडळातील अध्यक्ष यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित सर्व तरुण मंडळातील अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते