प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी
अतिग्रे तालुका हातकलंगले येथे हनुमान देवालय वारकरी संप्रदाय व श्री हरी मंदिर वारकरी संप्रदाय यांच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पारायण सोहळ्यास माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांनी या पारायण सोहळ्यास भेट दिली .
यावेळी वारकरी यांच्या माध्यमातून दिंडीचे नियोजन केले जाते त्यामध्ये सहभागी व ग्रंथाचे वाचन यामध्येही माझी आमदार सुजित मिंचेकर यांनी सहभाग घेतला यावेळी वारकरी संप्रदाय यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,एडवोकेट चिंतामणी कांबळे ,लालासो पाटील ,धनाजी पाटील ,उत्तम पाटील ,भगवान पाटील ,प्रवीण पाटील ,दिलीप कावणे, संदीप पाटील ,महेंद्र कांबळे, प्रज्योत सूर्यवंशी, व नागरिक उपस्थित होते