अतिग्रे येथे जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचे मार्फत शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला



प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे

   अतिग्रे तालुका हातकलंगले येथे जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जवान तानाजी पाटील वाढदिवस उत्सव समिती अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी 160 लोकांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये असणारे शिक्षण क्षेत्रात सेवक कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला अतिग्रे या गावामध्ये राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले असेही शिक्षक आहेत त्याचबरोबर अतिग्रे गावातील प्रगतशील शेतकरी माननीय धोंडराम बापू कुंभार यांचाही सत्कार करण्यात आला. 

               पत्रकार  भरत शिंदे यांचा सत्कार

 मराठी एस न्यूज व प्रेस मीडिया लाईव्ह चे पत्रकार माननीय भरत शिंदे यांचे त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला . 

शिक्षक यांच्या वतीने मेजर तानाजी पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री संग्राम पाटील यांनी केले यावेळी बोलताना शिक्षकांनी आपले मनोगत चांगले प्रकारे मांडले व आमचा जो आज जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेने सत्कार करून मानसन्मान करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करीत आहे व असेच आपल्या संस्थेमार्फत कार्य व्हावे असे मनोगत मध्ये सांगण्यात आले

     यावेळी उपस्थित जय जवान जय किसान सेवाभावी संस्था चे सर्व पदाधिकारी सदस्य आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय धोंडीराम पाटील, स्वामी विवेकानंद संस्थेचे अजीव सभासद माननीय गोपाल कुंभार सर ,उद्योजक माननीय महादेव चौगुले सर, माजी मुख्याध्यापक एकनाथ पाटील सर ,आर बी पाटील सर, डॉक्टर एट पीएचडी झालेले रंगराव कावणे सर ,सौ कल्पना सूर्यवंशी मॅडम ,श्री आत्माराम बिडकर सर, श्री वसंत बाळा पाटील सर ,संदीप बिडकर ,व सर्व शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते आभार मेजर माननीय नितीन पाटील यांनी मांडले

   अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे

Post a Comment

Previous Post Next Post