प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी :
हेरले (ता.हातकणंगले) येथे आज सकाळी ११ते ११:१५ च्या सुमारास (माळ भाग) आंबेडकर नगर येथे राहणारे एलिसन नाना खाबडे यांच्या घरी विद्युत शॉट सर्किटमुळे घराला आग लागली. यामध्ये प्रापचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यात फ्रिज. टीव्ही. इलेक्ट्रिक साहित्य असे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले यात कोणतीही जीवित हानी झाली नसून, मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. आग एवढी भयानक होती की, घराचे छत देखील आगीत जळून खाक झाले आहे.या घटनेची पाहणी हेरले येथील कोतवाल मोहम्मद जमादार यांनी केली आहे. तर हेरले चे उपसरपंच बख्तियार जमादार ग्रामपंचायत सदस्य- उर्मिला कुरणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व माहिती घेतली