जामा मस्जिद ट्रस्ट देहूरोड यांचा ईदे-मिलाद निमित्त कार्यक्रम थाटात संपन्न

  जामा मस्जिद विश्वस्त कमिटी तर्फे सर्व मुलांना भेट वस्तू वाटप करण्यात आले


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवर अली शेख : 

देहूरोड  : शहरातील प्रमुख जामा मस्जिद विश्वस्त मंडळ यांच्या वतीने दर वर्षी ईद ए मीलाद चा कार्यक्रम मस्जिदच्या आवारामध्ये होत असते दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील ईद ए मीलाद निमित्त मस्जिद मध्ये चालणाऱ्या मक्तब मदरसा तील मुलांचे भाषण व स्पर्धाचे कार्यक्रम घेण्यात आले, मुलांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित विविध क्षेत्रातील कार्यांवर व्याख्याने दिली. शहरातील विविध विश्वस्त मंडळांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते, 


मक्तब मदरसा मधे शिकणाऱ्या मुलांचे पालक वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते. जामा मस्जिद विश्वस्त मंडळातर्फे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले, तसेच शहरातील प्रमुख उपस्थित मान्यवर  हाजी अ.रज्जाक शेख,पापा खान शितला नगर, गफुर भाई शेख मुस्लिम विचार वंत अध्यक्ष मावळ तालुका काँग्रेस मायनॉरिटी ,हाजी अ.रशीद शिकीलकर,समीर शेख वरिष्ठ पत्रकार,फारुख शेख,बादशा भाई तांबोळी,हाफीज अन्वरअली शेख अध्यक्ष ऑल इंडिया उलमा बोर्ड मुत्ववली विंग पिंपरी चिंचवड शहर,हुसेन भाई शेख ,मेहबूब भाई गोंदाज अध्यक्ष काँग्रेस पार्टी मायनॉरिटी सेल देहूरोड शहर,गौस भाई सूनार राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, अ. रेहमान भाई टोपण मलकट्टी मुस्लिम विचार वंत, आदी... यांचा जामा मस्जिद देहूरोड विश्वस्त मंडळ, अनिस शेख, फरहत अत्तार, अशरफ अत्तार,अब्बास शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आले,

 जामा मस्जिद देहूरोड विश्वस्त मंडळ दर वर्षी ईद ए मिलाद निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करेल तसेच गोर गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करेल अशी प्रतिक्रिया प्रेस मीडिया लाईव्ह शी बोलताना अनिस शेख विश्वस्त जामा मस्जिद यांनी दिली.

दरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी हाजी रज्जाक शेख, अ.रेहमान भाई टोपणकट्टी , गफुर भाई शेख यांनी   आपल्या प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या,तसेच आयोजकांनी सर्वांसाठी गोड खिराचाहीआस्वाद घेण्यास विनंती केली,

जामा मस्जिद देहूरोड विश्वस्त मंडळा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,

Post a Comment

Previous Post Next Post