प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
महाराष्ट्रात लाच घेणे सर्वच ठिकाणी चालू असून काही किरकोळ लोक जे जागरूक आहेत ते पुढे येऊन तक्रारी करतात त्या मुळे काही दिवस वचक निर्माण होते. नंतर मागे तसे पुढे...लाच घेणाऱ्याना कायद्याची भीतीच राहिलेली नाही. शासकीय अधिकारी यांना भक्कम पगार असून देखील लाच घेतात याला कोठे तरी पायबंद घातला पाहिजे , शिवाय कडक शिक्षा करण्यात यावी .
काही दिवसापूर्वी कर्जत तहसील कार्यालयातील अव्वल कारकून रवी दशरथराव सोनकांबळे यास जप्तीचे वॉरंट बजावण्याकरिता दहा हजारांची लाच घेताना अलिबाग येथील येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते .
रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये एसटीओ मारुती रामचंद्र पवार यांस सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे... उप कोषागार कार्यालय अधिकारी माणगावचे एसटीओ मारुती रामचंद्र पवार यांनी काशीबाई तुकाराम महाबळे राहणार साईनगर यांच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली होती.या मागणी संदर्भात काशीबाई यांनी एसीबीकडे तक्रार केली.यानंतर रामचंद्र पवार सहा हजार रुपये घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले माणगाव मध्ये सातत्याने लाचखोरीचे प्रकरण उघड होत आहेत . तरीही लाच घेणारा अधिकाऱ्याला याचा काहीच फरक पडत नाहीय असे सध्याच्या घडीला दिसत आहे.