प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
चंदगड -येथील पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता असलेल्या सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे (रा.बेळगाव) यांना पंचवीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.तेथील ठेकेदाराने घुल्लेवाडी गावात पाणी पुरवठा योजनेचे सुधारीकरण करण्याचे काम घेतले होते .त्याचे बिल मंजूर केले म्हणुन 33 हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तडजोड करून पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरवले ती रक्कम घेताना सुभद्रा कांबळे यांना रंगेहाथ पकडून कारवाई केली.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे ,श्री.संजय बंबग्रेकर ,पूनम पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.