अतिग्रे विकास सेवा संस्था व कैलासवासी गणपतराव कुंभार विकास सेवा संस्था यांची सन 2022 -23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न





प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे 

 अतिग्रे तालुका हातकलंगले येथे अतिग्रे विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित अतिग्रे व कैलासवासी गणपतराव कुंभार विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित अतिग्रे यांची सन 2022 -23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीचे आनंदाने सभा संपन्न झाली . 

अतिग्रे विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांचे शंकेचे निरसन संस्थेचे सचिव नंदकुमार पाटील यांनी केले तसेच सहकार प्रशिक्षणासाठी तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्र प्राचार्य भगवान घाटगे यांनी त्याची माहिती सर्व सभासदांना सांगितले तसेच अतिग्रे विकास सेवा संस्थेमार्फत पाच टक्के लाभांश जाहीर केले आहे व कर्जमाफीतून रुपये 45 लाख व व्याज माफीतून नऊ लाख सभासदांना मिळवून दिल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला त्याला अनुमोदक शशिकांत पाटील सर यांनी केले 2022 -23 सालातील संस्थेने दोन कोटी दहा लाख कर्ज वाटप करण्यात आले व दोन लाख 65 हजार नफा झाला आहे

  तसेच कैलासवासी गणपतराव कुंभार विकास सेवा संस्थेमार्फत संस्थेचे सचिव अरविंद पाटील यांनी सभेतील सर्व विषयाचे वाचन केले व सभासदांच्या शंकेचे निरसन केले सन 2022-23 सालामध्ये संस्थेने दोन कोटी 75 लाख कर्ज वाटप केले व 62 हजार नफा झाला व्याज परतावा एक लाख साठ हजार व कर्जमाफी 14 लाख झाले आहे असे दोन्ही संस्थेचे सचिव यांनी वाचन केले

    यावेळी उपस्थित सरपंच सुशांत वड्ड, माजी सरपंच सागर पाटील, अतिग्रे विकास सेवा संस्था तक्रार निवारण समिती अध्यक्ष श्रीधर पाटील ,चेअरमन मारुती कुंभार, व्हाईस चेअरमन प्रशांत गुरव ,संचालक सारंग पाटील ,अभिजीत चौगुले, दिलीप कावणे, बाळासो पाटील ,राजाराम पाटील, हिंदुराव पाटील, सुकुमार सूर्यवंशी ,विजय गोंधळी, बाळासो यादव ,चेअरमन बंडू चौगुले ,व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील ,संचालक भोपाल कुंभार ,सचिन चौगुले ,अरविंद कांबळे ,शशिकांत कावणे, प्रवीण पाटील, व संस्थेतील सर्व सभासद उपस्थित होते

  

Post a Comment

Previous Post Next Post