प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे :
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे कामधेनु सहकारी दूध संस्थांची चालू सालातील वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली संस्थेची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आहे आज संस्थेची 53 वी वार्षिक सभा संपन्न झाली .
यावेळी प्रथमतः संस्थेचे माजी चेअरमन श्री बाबासो तुकाराम पाटील यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री शशिकांत पाटील सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले संस्थेचा चालू वर्षातील अहवाल संस्थेचे चेअरमन श्री सचिन पाटील सर यांनी केले संस्थेचे एकूण सभासद 287 इतकी आहेत संस्थेचे खेळते भांडवल सहा लाख 28 हजार आहे वार्षिक उलाढाल दोन कोटी ५० लाख इतकी आहे व्यापारी नफा 26 लाख 8 हजार इतका झालेला आहे संस्थेचे ऑडिट नेहमी अ वर्गामध्ये केले जाते असे चेअरमन यांनी सांगितले तसेच सभासदांना डिव्हीडंट 12% इतका देण्याचे नमूद करण्यात आले तसेच सभासदांना दीपावली भेट संस्थेमार्फत दिली जाते संस्थेमार्फत वेळोवेळी जनावरांची शिबिर घेतली जातात संस्थेतील कर्मचारी यांना दीपावली बोनस दिला जातो संस्थेमार्फत गाय म्हैस दूध संकलन ज्यादा असणाऱ्या सभासदांमध्ये नंबर काढले जातात त्यामध्ये, म्हैस ,प्रथम क्रमांक रूपाली दत्तात्रय पाटील ,द्वितीय क्रमांक शशिकांत पाटील ,तृतीय क्रमांक शरद पाटील ,गाय ,प्रथम क्रमांक अंकुश पाटील ,द्वितीय क्रमांक प्रकाश पाटील ,तृतीय क्रमांक बाबासाहेब चौगुले ,यांना देण्यात आले.
या सभासदांचे अभिनंदन चा ठराव संतोष गुरव सर यांनी मानले तसेच शासकीय ऑडिटर माननीय आर बी पाटील यांचा सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन हिंदुराव यादव सर यांनी केले राजश्री शाहू आघाडीचे नेते माननीय श्रीधर पाटील सर यांनी संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले संचालक श्री शशिकांत पाटील यांनी दूध वाढ होणे संबंधी सभासदांना आवाहन करण्यात आले व ऐनवेळी येणाऱ्या विषयांची चर्चा केली संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम मध्ये आयोजन केले जाते महिला शिबिरे सहली यांचीही नियोजन केले जाते त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
माजी सरपंच प्रशांत गुरव सर यांनी संस्थेने केलेल्या कामाबद्दलचा अभिनंदनचा ठराव मांडला तसेच संस्थेचे चेअरमन श्री सचिन पाटील सर यांना सुजित मिंचेकर फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला व रोटरी क्लब अध्यक्षपदी श्री सचिन चौगुले सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला तसेच कुमारी ऐश्वर्या शशिकांत पाटील हिने राजीव गांधी युनिव्हर्सिटी बेंगलोर सन 2023 मध्ये झालेल्या बी ए एम एस परीक्षेमध्ये यश प्राप्त केले त्याबद्दल तिचाही सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला व आई फाउंडेशन मार्फत अतिग्रे गावामध्ये वेळोवेळी जनावरांची शिबिर घेतले जातात व जनावरांना लागणारे औषध उपचार मोफत आई फाउंडेशन मार्फत केले जातात त्यांचा संस्थेमार्फत अभिनंदनचा ठराव करण्यात आला पंचक्रोशी कामधेनु दूध संस्था एक सहकारातला आदर्श आहे असे सभासदांनी व्यक्त केले शेवटी आभार श्री संतोष गुरव यांनी मांडले यावेळी अतिग्रे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच ,उपसरपंच, सदस्य, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सेक्रेटरी ,कर्मचारी ,व सर्व सभासद उपस्थित होते