प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
गुरुकुल विद्यालय चोकाक मध्ये शालेय मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पार पडली काय झालं यामध्ये इयत्ता आठवी इयत्ता नववी चे दहा विद्यार्थी उमेदवार म्हणून सहभागी झाले इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी च्या 150 विद्यार्थी यांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले .
या कार्यक्रमाचे उद्घाटन हेरले ग्रामपंचायत सदस्या सौ रंजना माने व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक विनायक चव्हाण सर यांनी केले या शालेय निवडणुक प्रक्रियेचे नियोजन विद्यालयाचे चेअरमन व चोकाक गावचे उपसरपंच श्री प्रवीण माळी सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातील मुख्याध्यापक सुरेश सुतार, शिक्षिका सौ त्रिशला पाटील, भाग्यश्री यादव ,वैशाली पाटील ,स्वाती चोकाकर, विनायक चव्हाण ,व क्लार्क शुभम पाटील यांनी केले विद्यार्थ्यांना या मतदान प्रक्रिये विषयी उपसरपंच प्रवीण माळी यांनी मार्गदर्शन केले