प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अतिग्रे येथे आयुष्मान भव मोहिमेचे उद्घाटन संप्पन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी  : भरत शिंदे

    अतिग्रे तालुका हातकलंगले येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आयुष्मान भव मोहिमेचे आज दिनांक 13 9 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अतिग्रे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड , उपसरपंच सौ छाया पाटील, सदस्या सौ कल्पना पाटील, सौ दिपाली पाटील  ,सौ कलावती गुरव ,श्रीमती अक्काताई शिंदे ,सदस्य श्री भगवान पाटील ,श्री बाबासो पाटील ,श्री अनिरुद्ध कांबळे ,श्री राजेंद्र कांबळे, उत्तम पाटील अमर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री धनाजी पाटील ,माजी सरपंच तानाजी पाटील ,ज्येष्ठ नागरिक सखाराम मुसळे ,रावसाहेब चौगुले ,या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्डचे वाटप करण्यात आले


 प्रास्ताविक श्री आरोग्य सेवक महेश वडर यांनी केले त्यावेळी त्यांनी बोलताना आयुष्मान भव भारत मोहिमेची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात आली या मोहिमे अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी स्वच्छता अभियान आयुष्मान मेळावा रक्तदान मोहीम आवयदान जागृती मोहीम आयुष्मान सभा अंगणवाडी व प्राथमिक शाळा मधील मुलांची तपासणी वय वर्ष शून्य ते अठरा आयुष्मान भव मोहिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात 13 9 2023 रोजी उद्घाटन करण्याचे आदेश नुसार केले गेले आयुष्मान दारी अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी वितरण करणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेदरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये शाळा महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे याकरिता लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य जन आरोग्य समिती सदस्य व रुग्ण कल्याण समिती यांना सहभागी करण्याचे आहे आरोग्य संस्थेतील सर्वाधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांना संसर्ग नियंत्रण आणि प्रति बंधात्मक उपाय याबाबत अवगत करण्यात यावे व आपल्या स्तरावर जनजागृती करण्यात यावी आरोग्य वर्धनी केंद्र स्तरावर आयुष्यमान मेळाव्याचे चार आठवडे आयोजन केले जाते तसेच या मोहिमेंतर्गत अतिग्रे येथे विशेष ग्रामसभा लावण्याचे नियोजन करण्यात येईल तसेच गावा मध्ये संपूर्ण सर्वे करून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाईल असे सांगण्यात आले शेवटी आभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उषा राणी खोत यांनी केले

   यावेळी उपस्थित प्राथमिक उपकेंद्र मधील डॉक्टर आरोग्य सेवक मदतनीस आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते

  

Post a Comment

Previous Post Next Post