काकर समाजाने शैक्षणिक व आर्थिक प्रगतिकडे लक्ष केंद्रित करावे....शकील कुरेशी
प्रेस मीडिया लाईव्ह :
श्रीरामपूर येथील महाराष्ट्र काकर समाज संघटना, मुस्लिम को- ऑप. बँक शाखा श्रीरामपुर व फैज़ान-ए- जमील मेडिकल फाउंडेशन श्रीरामपुरच्या वतीने लोणी येथील शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थी हंजला हबीब काकरचा सत्कार करण्यात आला.
त्या वेळी मुस्लिम काॅ.ऑप बैंकेचे शाखा मॅनेजर शकील भाई क़ुरैशी यांनी काकर समाजाच्या सदस्यांचे चांगल्या प्रकारे शिक्षण व बँकेचे कामा विषयी मार्गदर्शन करुन माहिती दिली. लोणी व बाभळेश्वर या दोन्ही ठिकाणी समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते . काकर समाजाचे प्रदेश अध्यक्ष वैजापूर नगर पालिकेचे मा नगर सेवक बिलाल हुसेन काकर यांनी मैनेजर शकील कुरेशी यांना पुष्प गुच्छ व शाल देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष व फैज़ान-ए-जमील मेडिकल फाउंडेशन चे कार्य अध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर यांनी केले. या वेळी युवक कार्य अध्यक्ष काकर समाज जावेद काकर, जुनेद काकर, हबीब काकर, मराठी चित्रपट अभिनेता काकर समाज चे तालुकाध्यक्ष सलीम काकर, इस्माईल काकर व लोणी बाभळेश्वर येथील काकर समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते. असी माहिती प्रेस मीडिया लाईव्हचे व्यवस्थापक व मुस्लिम बँकेचे संचालक व रिकवरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी दिली.