प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ /प्रतिनिधी:
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त अनुभव मंडप शिवालय अंकली येथे मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रक्तदान व वृक्षारोपणाचे उद्घाटन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटकचे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ हे उपस्थित होते.
श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने गणपतराव पाटील यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या सर्वांगीण कामाचा आढावा घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. इतर मान्यवरांनीही डॉ. प्रभाकर कोरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिव्य निधी परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामीजी संस्थान मठ निडसोसी, परमपूज्य अल्लमप्रभु महास्वामीजी चिंचणी, परमपूज्य संपादना महास्वामीजी चरणमूर्ती मठ चिक्कोडी, परमपूज्य अमरसिद्धेश्वर महास्वामीजी संस्थान मठ अंकलगी यांच्यासह के. एल. ई. बेळगाव अचरणा समिती अध्यक्ष बी. आर. पाटील तसेच रायबागचे आमदार दुर्योधन एव्हळे, कागवाडचे आमदार राजु कागे, महेंद्र बागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.