प्रेस मीडिया लाईव्ह :
नांदणी/ प्रतिनिधी:
शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन व नांदणीतील ग्रामस्थांच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी गांधी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मातंग समाज सांस्कृतिक हॉल येथे डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती आण्णासाहेब चकोते होते.
यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांचे विचार आज कष्टकरी, दिनदलित, गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित जनता यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे बनले आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यात ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या वेदना आणि अन्यायाच्या विरुद्ध उभारलेला लढा प्रकर्षाने जाणवतो. कथा, कविता, कादंबरी, पोवाडा आणि शाहिरीच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. आण्णासाहेब चकोते म्हणाले, नांदणी मध्ये पक्ष गट न मानता सर्वच तरुण वर्ग महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो, त्यांचे आचार, विचार रुजवण्याचे काम करतो हे खरोखरच कौतुकास्पद आहे. गावकरी श्रमसंस्कार आणि महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करीत असल्याने गावाबरोबरच परिसरातील गावावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील म्हणाले, आज समाजाला अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. साहित्याचा प्रभाव आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्या प्रभावातूनच चांगल्या विचारांची निर्मिती होत असते. डॉ. सागर पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आढावा घेतला.
प्रारंभी संदीप बिरांजे यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. सरपंच सौ. संगीता तगारे यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय सुतार यांनी तर आभार बाबासाहेब बागडी यांनी मानले.
यावेळी उपसरपंच अजय कारंडे, सागर संभूशेटे, माजी उपसरपंच महेश परीट, अजित पाटील, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, ग्रा.पं. सदस्य दीपक कांबळे, अझर शेख, दिलीप परीट, किरण आंबी, डॉ. सिद्राम कांबळे, रमेश भुई, इब्राहिम मोमीन, प्रकाश लठ्ठे, महावीर पाटील, प्रल्हाद आंबी, आकाश कुरणे, संतोष खरात, पोलीस पाटील सुनील पाटील, उमेश संभूशेटे, मातंग समाज नांदणीचे अध्यक्ष अविनाश बिरांजे, उपाध्यक्ष अरविंद मोहिते, संदीप आवळे, कपिल तिवडे, विशाल बिरांजे, दिपक मोहिते, अक्षय चौगुले, सागर मोहिते, सचिन बिरांजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.