रायगड जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे बंद करा

 

ऐंड काशिनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी या बाबत तक्रार सरकारी दरबारी केली आहे परंतु सरकारी अधिकारी या कडे दुर्लक्ष करत आहेत असे दिसून येते

मा. गृहमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय सचिवालय मुंबई



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्ह्यात मटका, जुगार, पत्याचे क्लब, ऑन लाईन चक्री मटका, पेटी बाजार, चिमणी पाखर, झेंडी टोपी, पताडा, आंदर बाहर, १३ पानी/२१ पानी / २७ पानी रम्मी, लेडीज डान्स बार असे असंख्य बेकायदेशीर जुगार अड्डे राजरोसपणे दुकाने थाटून खुलेआम चालू आहेत. मी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. माझ्या अधिकृत twitter अकाउंट @kashinathAdv या अकाऊंटवर शेकडो वेळा मा. मुख्यमंत्री साहेब, मा. गृहमंत्री साहेब, मा. राज्यपाल साहेब, मा. पोलीस महासंचालक साहेब, मा. पोलीस अधीक्षक साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब रायगड यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु आजपर्यंत भ्रष्ट प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही आपले सरकार बेकायदेशीर धंद्यांना संरक्षण देत असल्याचे निदर्शनास येत आहे..

मा. गृहमंत्री साहेब आपल्या बात्यामार्फत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे जनतेमध्ये आपले सरकार हे अकार्यक्षम असल्याची भावना निर्माण झाली आहे. आपल्या अकार्यक्षम सरकारमुळे जनतेत आपल्या सरकार विषयी असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. आपण जातीने लक्ष देऊन रायगड जिल्ह्यातील बेकायदेशीर मटका जुगार क्लब चक्री ऑन लाईन मटका आणि लेडीज डान्स बार हे बेकायदेशीर धंदे तात्काळ बंद करावेत हि नम्र विनंती.

1 Comments

  1. पोलिस ही वसूली में लगी है तो ये मटका,जुगार, ऑनलाइन जुगार,सलिया चोरी,ऑयल, केमिकल चोरी मिक्सिंग हर एक धंदे से 15 से 18 लाख महीने की वसूली पोलिस करती है और यही लोग अवैध धंदे का परमिशन और इन सबको संरक्षण देते हैं, वसूली माफिया में न.1 पर है LCB के राजा पाटिल फिर धंदा बंद कौन करेगा रायगड़ में ?

    ReplyDelete
Previous Post Next Post