सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या Edelweiss वर कठोर कारवाई करा
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
गेली अनेक अनेक वर्ष चित्रपटसृष्टी समाजकारण क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई दादा हे कार्य करत होते आमच्या स्थानिक ठिकाणी कर्जत खालापूर येथे एनडी स्टुडिओच्या माध्यमातून असंख्य तरुणांना नोकऱ्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना काम व अनेक कठीण प्रसंगी नागरिकांना प्रशासनाला मदतीसाठी दाता म्हणून त्यांचा अनुभव आलेला आहे त्यामध्ये देशातील पंतप्रधानांपासून तर सर्वसामान्यांपर्यंत कलेच्या माध्यमातून सर्वांनाच सहकार्य सहयोग लाभला आहे चित्रपटसृष्टीतील अशा विश्वकर्माला एडलवाईज कंपनीच्या माध्यमातून कर्जाचं अमिष दाखवून त्यांना स्वतःहून कर्ज देणे त्यानंतर काही अंशता रक्कम परतफेड करून देखील उर्वरीत रक्कम करिता काही पर्याय दिले असताना देखील ND स्टुडिओ च हवा हे आहे हे कशासाठी कोणासाठी? NCLT हा दोन्ही लोकांमधील दुवा असून मार्ग काढणे हा त्याचे काम असते परंतु जितेंद्र कोठारी नावाचा अधिकारी एडलवाईजहा इंडस्ट्रि ची जागाच पाहिजे अशी एकेरी आणि एकतर्फी भूमिका घेऊन नितीन देसाई यांनाच त्रास का देत होते.
सदर कंपनीला बँकेचा दर्जा नसताना दिवाळखोर घोषित करून बदनामी कशी करू शकतात तर सदर कालावधीमध्ये बॉलीवूडमधील असंख्य नामवंत कलाकारांच्या प्रॉडक्शन्स कडून सदर स्टुडिओमध्ये शूटिंग येनेदेखील बंद झाले होते त्याचा या सदर प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही हे देखील तपासून पहाणे तितकेच आवश्यक वाटते. Edelweiss च्या माध्यमातून माध्यमातून कोणता उद्योग समूह किंवा राजकारणी यांना इंटरेस्ट होता का हे देखील संशोधनाचा विषय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आपणास निवेदन आहे की मालक रशेस शहा व प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहीर झालेली इतर अधिकारी यांची सखोल चौकशी करून, यांच्या पाठीमागे देखील मुळाशी कोणी आहे का आज सखोल तपास व चौकशी होणे गरजेचे आहे. नराधम Edelweiss च महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध करत असून एनडी स्टुडिओ हा संपूर्ण रायगडच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील एक नामवंत मराठमोळ्या कलाकाराचा देशातील सर्व भाषेतील कलावंतासाठीच एक मोठं व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ नितीन चंद्रकांत देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करून कोणी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र निर्माण सेना त्यास कडवा विरोध करेल, आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना हद्दपार करावे भविष्यात कोणालाही आत्महत्येस प्रवृत्त होता कामा नये याची काळजी घ्यावी.
धन्यवाद
प्रत रवाना मा पोलीस अधिक्षक साहेब रायगड
खालापूर पोलीस ठाणे
जितेंद्र पाटील
मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष
पोलीस निरीक्षक
कार्यालय से विंग, २०० मानस कॉम्प्लेक्स आमराई रोड, कर्जत, जि. रायगड, पिन कोड - ४१०२०१