प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पहिला विश्व पर्यावरण दिवस ०५ जून १९७४ दरवर्षी साजरा केला जात असला तरी आपल्या संतांनी १६ व्या शतकात झाडांचे महत्त्व पटवून दिले आहे." झाडांची मित्र समजून त्यांची काळजी घेतलीच पाहिजे.
अगदी याच उद्देशाने आपल्या तारुण्यात निसर्गाशी शुद्ध मैत्रीचे नाते जोडणारे सन्मा. प्रसाद बाळाराम पाटील साहेब- माजी सरपंच वशेणी याच्यां तर्फे आणि निसर्ग प्रेमी डॉ. हिराचंद पाटील साहेब यांच्या सहकार्याने *पर्यावरण प्रेमी , निसर्गाचा अविरत ध्यास घेणारे सारडे विकास मंचचे सर्वेसर्वा श्री.नागेंद्र जी म्हात्रे साहेब* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि. ०४/०८/२०२३ रोजी सकाळी १०.००* वाजता राजिप शाळा-वशेणी या शाळेतील विद्यार्थ्यांना फळझाडे वाटप वाटपाच्या कार्यक्रम सोहळा आज संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद पाटील माजी सरपंच वशेणी, शाळेचे मुख्याध्यापक संदीप गावंड, शिक्षक रमेश घरत, निलेश पाटील,विश्वास पाटील, बा.ज.म्हात्रे गुरुजी, विकी पाटील, सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे आदींची उपस्थिती लाभली होती.सोबतच शाळेतील सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.